News


अस्थेटिका इको रिसर्च प्रा. लिमीटेड, नाशिक वेस्ट 2 वेल्थ आयडियाथॉनच्या अंतिम फेरीसाठी पात्र

नाशिक (१ ऑगस्ट): अस्थेटिका इको रिसर्च प्रा. लिमीटेड, नाशिक ही बायोटेक स्टार्टअप कंपनी आहे जी प्रामुख्याने जैविक, नैसर्गिक आणि सेंद्रिय होमकेअर उत्पादन आणि पुरवठा कंपनी आहे. अस्थेटिका इको रिसर्चने नाशिक इंजीनियरिंग क्लस्टरच्या इनोव्हेशन इनक्यूबेशन सेंटरद्वारे आयोजित कचरा ते संपत्ती (Waste 2 Wealth) आयडियाथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अस्थेटिका इको रिसर्च कडून श्री. पंकज निकुंभ, अध्यक्ष; डॉ. वासुदेव झांबरे, व्यवस्थापकीय संचालक; आणि सौ. अर्चना झांबरे, संचालक यांनी १ ऑगस्ट, २०२१ रोजी कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत भाग घेतला. व्यवस्थापकीय संचालक डॉ. वासुदेव झांबरे टीम लीडर होते आणि त्यांनी "स्वदेशी पर्यावरण अनुकूल जैविक स्वच्छता उपाय" (Indigeneous eco-friendly bio-based cleaning solutions) सादर केले. या कार्यक्रमादरम्यान, एनईसीच्या इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटरच्या संचालक मंडळाने उपस्थित राहून आयडियाथॉनचे मूल्यांकन केले.

Posted on 20 Aug 2021

डॉ. वासुदेव झांबरे, अस्थेटिका इको रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक व टीम लीडर, १ ऑगस्ट, २०२१ रोजी वेस्ट 2 वेल्थ आयडियाथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पिच डेक सादर करतांना.

International MSME Day

Posted on 27 Jun 2021